The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

गावागावांत वित्तीय समावेशन संतृप्तता शिबिरांचे आयोजन.

News Image

चंद्रपूर, दि. 21 : जिल्ह्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला बँकिंग व वित्तीय सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी भारत सरकारच्या वित्तीय समावेशन अभियानांतर्गत दिनांक 1 नोव्हेंबर 2026 ते  ते 12 जानेवारी 2027 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये विविध बँकांमार्फत वित्तीय समावेशन संतृप्तता शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा : 1) प्रधानमंत्री जनधन योजना (अंतर्गत पात्र नागरिकांची बँक खाती उघडणे, 2) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा विमा योजनांची माहिती व पात्रतेनुसार नोंदणी, 3) बँक खात्यांचे ई-केवायसी व केवायसी अद्ययावतीकरण करणे, 4) केंद्र सरकारच्या विविध वित्तीय समावेशन योजनांची माहिती देणे, 5) बँकिंग सेवा, आर्थिक साक्षरता व सामाजिक सुरक्षा योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करणे.

नागरिकांना आवाहन : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या गावात आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरामध्ये सहभागी होऊन उपलब्ध बँकिंग सुविधा व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून बँक खाते उघडणे, विमा योजनांमध्ये नोंदणी करणे तसेच आपल्या बँक खात्याचे केवायसी अद्ययावत करून घ्यावे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔भद्रावती तालुक्यात लोकसहभागातून जलसंधारणाला चालना.🔔कर्जमाफीच्या चवथ्या यादीत  जिल्ह्यातील 1115 शेतकऱ्यांचा समावेश.🔔राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जानवी भगतची  सुवर्णभरारी; डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा गौरव!🔔पदवीधर मतदार संघासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के मतदान.🔔राणी हिराई उमेद मार्ट येथे दिवाळी फराळ महोत्सव व विक्री प्रदर्शनी.🔔डाक जीवन विमा योजना एजंटकरीता अर्ज आमंत्रित.🔔मतदानाच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद.🔔सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने 23 ऐवजी 26 ऑक्टोबर रोजी कागदपत्रे पडताळणी.