The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

 संविधानच सर्वश्रेष्ठ, रक्षणासाठी सदैव लढत राहणार!  

News Image

मविआचे अभिजित वंजारी यांचे प्रतिपादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन.

 वाडी, नागपूर : भारतीय संविधान हेच सर्वश्रेष्ठ असून, संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये जपण्यासाठी आपण सदैव लढत राहू, असा निर्धार नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी वाडी येथे आयोजित सभेत बोलताना व्यक्त केला. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसऱ्यानिमित्त त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर देशभरातून येणाऱ्या बौद्ध अनुयायांना धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

वाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अश्विनजी बैस, माजी आमदार विजय घोडमारे, नागपूर ग्रामीण महिला काँग्रेस अध्यक्षा योगिता इटनकर, कुंदाताई राऊत, युवक काँग्रेसचे मिथिलेश कन्हेरे, श्याम मंडपे, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, माजी जिल्हा परिषद सदस्या ममता धोपटे, शिवसेनेचे नगरसेवक हर्षल काकडे, सामाजिक कार्यकर्ते बोनीभाई सेलोरे, अरुण कराळे, माजी पंचायत समिती सदस्य भीमराव कडू आणि लावा येथील उपसरपंच रॉबिन सिल्लारे उपस्थित होते.

पुढे बोलताना अभिजित वंजारी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन देशाच्या सामाजिक आणि वैचारिक इतिहासात नवा अध्याय लिहिला. हा दिवस केवळ धार्मिक परिवर्तनाचा नसून, समता, स्वाभिमान, विवेक आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश देणारा ऐतिहासिक दिवस आहे. बाबासाहेबांनी दिलेला हा विचार आजही समाजाला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि समानतेच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देतो, असे आ. वंजारी यांनी नमूद केले.

 

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येतात. श्रद्धा, प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाच्या या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने दीक्षाभूमीचा परिसर बाबासाहेबांच्या विचारांनी आणि धम्माच्या संदेशाने भारावून जातो. या सर्व अनुयायांचे स्वागत करताना त्यांच्या प्रवासाला मंगलमय शुभेच्छा देत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन आ. वंजारी यांनी केले.

 

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. संविधानातील मूल्यांचे रक्षण करणे, वंचित आणि दुर्बल घटकांच्या अधिकारांसाठी आवाज उठवणे तसेच समाजात बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संविधानाचा सन्मान आणि त्यातील लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी माजी मंत्री सुनील केदार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानातील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये जपण्याचे आवाहन केले. तसेच पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

खासदार श्यामकुमार बर्वे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत त्यांच्या विचारांनुसार समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याचा संदेश दिला. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांना निवडून देऊन पदवीधरांच्या प्रश्नांना प्रभावी प्रतिनिधित्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. सभेला विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. व्यवहारे.🔔भद्रावती तालुक्यात लोकसहभागातून जलसंधारणाला चालना.🔔कर्जमाफीच्या चवथ्या यादीत  जिल्ह्यातील 1115 शेतकऱ्यांचा समावेश.🔔राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जानवी भगतची  सुवर्णभरारी; डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा गौरव!🔔पदवीधर मतदार संघासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के मतदान.🔔राणी हिराई उमेद मार्ट येथे दिवाळी फराळ महोत्सव व विक्री प्रदर्शनी.🔔डाक जीवन विमा योजना एजंटकरीता अर्ज आमंत्रित.🔔मतदानाच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद.