The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या पाच फरार आरोपींचा शोध सुरू.

News Image

आरोपींना 27 ऑक्टोबरपर्यंत हजर राहण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश.

चंद्रपूर, दि. 13 : रामनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुखासह पाच आरोपींचा शोध सुरू आहे. संबंधित आरोपींनी 27 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी विशेष न्यायालय (मकोका) तथा अतिरिक्त सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे हजर राहावे, यासाठी न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 84 अन्वये उद्घोषणापत्र जारी केले आहे.

रामनगर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक 441/2026 अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, 1960, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, 1976, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील फरार आरोपींमध्ये 1) इमरान बब्बू शेख ऊर्फ इमरान कुरेशी (वय 38 वर्षे, रा. वॉर्ड क्र. 4, नरेश टॉकीज जवळ, गडचांदूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर), 2) सादीक खान नवाब खान ऊर्फ सादीक कुरेशी (वय 39 वर्षे, रा. वॉर्ड क्र. 4, अमलनाला रोड, इरिगेशन कॉलनी, गडचांदूर, ता. कोरपना), 3) वसीम रज्जाक कुरेशी (वय 33 वर्षे, रा. बबलू किराणा दुकानाजवळ, रयतवारी कॉलरी, चंद्रपूर), 4) सोहेल शेख अहमद शेख (वय 23 वर्षे, रा. महागाव, वांकडी, पोस्ट बाम्बरा, जि. कोमरामभीम, तेलंगणा) आणि 5) निजाम हमीद शेख ऊर्फ आवेश कुरेशी (वय 22 वर्षे, रा. वॉर्ड क्र. 4, लक्ष्मी टॉकीजच्या मागे, गडचांदूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे.

सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून तपास यंत्रणेला उपलब्ध झालेले नाहीत. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याने विशेष न्यायालय (मकोका) तथा अतिरिक्त सत्र न्यायालय, चंद्रपूरचे न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 84 अन्वये उद्घोषणापत्र जारी केले आहे.

त्यानुसार संबंधित पाचही आरोपींनी 27 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे. फरार आरोपींचा ठावठिकाणा किंवा त्यांच्याबाबत कोणतीही विश्वसनीय माहिती असल्यास नागरिकांनी रामनगर पोलिस ठाणे, चंद्रपूर येथे माहिती द्यावी, असे चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔भद्रावती तालुक्यात लोकसहभागातून जलसंधारणाला चालना.🔔कर्जमाफीच्या चवथ्या यादीत  जिल्ह्यातील 1115 शेतकऱ्यांचा समावेश.🔔राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जानवी भगतची  सुवर्णभरारी; डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा गौरव!🔔पदवीधर मतदार संघासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के मतदान.🔔राणी हिराई उमेद मार्ट येथे दिवाळी फराळ महोत्सव व विक्री प्रदर्शनी.🔔डाक जीवन विमा योजना एजंटकरीता अर्ज आमंत्रित.🔔मतदानाच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद.🔔सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने 23 ऐवजी 26 ऑक्टोबर रोजी कागदपत्रे पडताळणी.