The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

सेवानिवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महाउपलब्धी’बाबत कार्यशाळा संपन्न.

News Image

ई-केवायसी, मोबाईल नोंदणी व पीपीओ क्रमांकाबाबत मार्गदर्शन.

चंद्रपूर, दि. 06 : राज्य शासनाच्या सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ‘महाउपलब्धी’ प्रणालीचा सुलभपणे वापर करता यावा, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित या कार्यशाळेत ‘महाउपलब्धी’ प्रणालीचा वापर, आवश्यक माहितीची नोंदणी, निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँक खात्याचे ई-केवायसी, मोबाईल क्रमांकाची नोंदणी तसेच पीपीओ क्रमांकासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काही महिन्यांत निवृत्तीवेतनाची देयके ई-बिल प्रणालीद्वारे अदा करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ज्या बँक खात्यात निवृत्तीवेतन जमा होते, त्या खात्याचे ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यशाळेदरम्यान उपस्थित सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच ‘महाउपलब्धी’ प्रणालीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया व माहिती समजावून सांगण्यात आली.

कार्यशाळेला जिल्हा कोषागार कार्यालयातील तृप्ती टेमकर, अपर कोषागार अधिकारी स्वाती कुलकर्णी, अपर कोषागार अधिकारी संजय पडीशालवार, निवृत्तीवेतनधारक संघटनेचे उपाध्यक्ष अरुण धानोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. व्यवहारे.🔔भद्रावती तालुक्यात लोकसहभागातून जलसंधारणाला चालना.🔔कर्जमाफीच्या चवथ्या यादीत  जिल्ह्यातील 1115 शेतकऱ्यांचा समावेश.🔔राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जानवी भगतची  सुवर्णभरारी; डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा गौरव!🔔पदवीधर मतदार संघासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के मतदान.🔔राणी हिराई उमेद मार्ट येथे दिवाळी फराळ महोत्सव व विक्री प्रदर्शनी.🔔डाक जीवन विमा योजना एजंटकरीता अर्ज आमंत्रित.🔔मतदानाच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद.