The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

विश्वास आणि विकासाच्या सूत्रावर भाजपचा महापौर विराजमान – आ. किशोर जोरगेवार.

News Image

 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर संपूर्ण राज्याचा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्वसमावेशक आणि गतिमान विकास होत आहे. याच विश्वासाच्या आणि विकासाच्या धर्तीवर आज चंद्रपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाली असून, विश्वास आणि विकासाच्या सूत्रावर भाजपचा महापौर विराजमान झाला असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. आमदार जोरगेवार म्हणाले की, देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेतही भाजपची सत्ता असणे गरजेचे होते. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय असल्यास विकासकामांना गती मिळते, आणि त्याचा थेट फायदा नागरिकांना होतो.  

 चंद्रपूरच्या विकासाला प्राधान्य देत उबाठा गटातील नगरसेवकांनी व्यापक विचारातून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि भाजपचा महापौर विराजमान केला. उबाठा गटाचे समर्थन शहराच्या भवितव्यासाठी घेतलेला जबाबदार निर्णय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नव्या सत्तेच्या माध्यमातून चंद्रपूर शहराचा पायाभूत विकास, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या विषयांना प्राधान्य दिले जाईल. चंद्रपूरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी ही महापालिका कटिबद्ध राहील, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.