The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मृत विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत.

News Image

वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना आर्थिक दिलासा. आमदार मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्याकडे केली होती मदतीची मागणी. चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळाली आहे. गोपाल गणेश साखरे (बुलढाणा) आणि स्वप्निल उद्धवसिंह शिरे (छत्रपती संभाजीनगर) या दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. आमदार मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. १० मे २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर मोठा आघात झाला होता आणि संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.या घटनेनंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीवर चर्चा करून या कुटुंबांना मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने ४ मार्च २०२६ रोजी आदेश जारी करून गोपाल गणेश साखरे (बुलढाणा) आणि स्वप्निल उद्धवसिंह शिरे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दुर्दैवी घटनेत आपल्या मुलांना गमावलेल्या कुटुंबियांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला असून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.