The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

वर्धा नदीत बुडून बाप-लेकीसह भाचीचा मृत्यू, आमदार किशोर जोरगेवार यांची सांत्वनपर भेट.

News Image

धानोरा परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत वर्धा नदीकाठी आंघोळ व कपडे धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकीसह भाचीचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतकांच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.राजू कोडापे (वय ४०), अर्पिता कोडापे आणि प्रियंका मडावी अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबीय वर्धा नदीकाठी आंघोळ व कपडे धुण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली.दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतकांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी त्यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली असून, शासनाकडूनही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.यावेळी सरपंच विजय आगरे, उपसरपंच विनोद खेवले, राकेश पिंपळकर, करण नायर आदी उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.