The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

मोबाईलच्या युगात मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे कौतुकास्पद आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

News Image

साखरवाही येथे पुरुषांच्या भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन. आ. मुनगंटीवार यांची बैलबंडीवर मिरवणूक आणि लाडू तुला

चंद्रपूर  - मोबाईलच्या युगात मैदानी खेळ व पारंपरिक संस्कृती मागे पडत आहे. अशा परिस्थितीत मैदानी कबड्डी स्पर्धा आयोजित करून आपली परंपरा जपली जात आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. कार्यक्रमास्थळापर्यंत आमदार श्री. मुनगंटीवार यांची बैलबंडीवरून लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली. तसेच लाडूतुला करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. अनेक वर्षांनंतर बैलबंडीवर बसण्याचा योग आल्याची भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. प्रेमाने व आपुलकीने केलेल्या स्वागताबद्दल साखरवाहीतील कार्यकर्ते व ग्रामस्थांचे त्यांनी आभारही मानले.चंद्रपूर तालुक्यातील साखरवाही येथे जगदंब क्रीडा मंडळ व जय बजरंग क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुषांच्या भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिंद्र गावंडे, श्रेयस भालेराव, ब्रिजभूषण पाझारे, अनिल डोंगरे, शोभाताई पिदूरकर, विनोद खापने, सुरेश सोयाम, सिद्धार्थ कवाडे, रामभाऊ कडुकर  आदींची प्रमुख उपस्थिती होती.आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘१९९५ ते २००९ मी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. येथील नागरिकांनी मला कायमच प्रेम आणि आशिर्वाद दिले. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले, तेव्हा आनंदाने स्वीकारले. जवळपास पंधरा वर्षांनी आपल्याला भेटताना आनंद होत आहे. या गावाच्या सेवेसाठी कधीही आवाज द्या, तुमच्यासाठी धावून येईल. कारण १९९५ मध्ये तुम्ही निवडून दिले नसते तर मी आज शेतकऱ्यांचे, उपेक्षितांचे प्रश्न विधानसभेत मांडू शकलो नसतो.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.