The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

म्हाडा अंतर्गत १४४ कोटींच्या विकासकामांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला आढावा.

News Image

दुसऱ्या टप्यातील विकास आराखडा शासनाकडे सादर, नागपूर येथे म्हाडा अधिकाऱ्यासह बैठक घेत चर्चा. नवीन चंद्रपूर  : च्या नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत म्हाडा अंतर्गत विविध विकासकामांना गती दिली असून, पहिल्या टप्प्यातील तब्बल १४४ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हाडाच्या नागपूर विभागीय कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा केली. बैठकीदरम्यान प्रस्तावित विकासकामांचे आराखडे, तांत्रिक बाबी, प्रशासकीय प्रक्रिया तसेच कामांची अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामे दर्जेदार, लोकाभिमुख आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय इंगोले यांच्याशीही विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहराच्या वाढत्या नागरीकरणाचा मुद्दा ठळकपणे मांडला. सन १९९८ मध्ये म्हाडाची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार त्या काळात येथील विकास आराखडा तयार करण्यात आला. मात्र गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती वाढली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक सोयीसुविधा आणि इतर पायाभूत विकासकामांची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले. आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढे सांगितले की, म्हाडा अंतर्गत तब्बल १ हजार ३९१.७१ हेक्टर जागा आरक्षित करण्यात आली असून, त्यापैकी जवळपास २०० हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. या संपूर्ण क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी जवळपास ११ हजार कोटी रुपयांचा एकत्रित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या विकासकामांसाठी शासनाने तीन टप्प्यांची रूपरेषा निश्चित केली असून, त्यातील पहिल्या टप्प्यासाठी १४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्यातील विकासकामांसाठी २४२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नवीन चंद्रपूर :  येथील भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आधुनिक आणि दीर्घकालीन विकास साधण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी संबंधित कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे सदर निधी संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनातही हा विषय उपस्थित केला होता. त्यांनतर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.या संदर्भात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. पुढे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतरही आमदार जोरगेवार यांनी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवत निधी मंजुरीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी २२ मे २०२५ रोजी नागपूर येथील म्हाडा कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत म्हाडा नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुमार मेघमाडे, कार्यकारी अभियंता दीप्ती काळे, अभियंता मोनिका थोटे, एडीटीपी भाग्यश्री टाक विद्युत विभागाचे उपअभियंता चंद्रशेखर वानखेडे व करण नायर उपस्थित होते. या बैठकीत विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर मुंबई मंत्रालयात ७ मे २०२५ ला म्हाडा गृहनिर्माणचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासोबतही आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना विकास आराखडा तयार करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.या सर्व प्रयत्नांनंतर आता या विकासकामांसाठी निधी मंजूर झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. या निधीतून म्हाडा अंतर्गत दाताळा, कोसारा, पडोली या भागांमध्ये मुख्य डीपी रस्ते, स्ट्रीट लाईट, बंदिस्त नाली आदी मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.