The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने  म्हाडा च्या 2004 घरांना मंजुरी, रेल्वे विभागातर्फे प्रस्तावित बेदखल कारवाई स्थगितीची मागणी ---- डॉक्टर मंगेश गुलवाडे

News Image

चंद्रपूर, सावरकर नगर, उडिया बस्ती, महाकाली कॉलरी व बगड खिडकी, जिल्हा चंद्रपूर येथील 191 कुटुंबांना रेल्वे प्रशासनाकडून दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी बेदखल नोटीस देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मा. आमदार डॉ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

सदर कुटुंबे ही रेल्वे अधिग्रहणग्रस्त असून त्यांच्या पुनर्वसनासाठी मा. डॉ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाकडून नवीन चंद्रपूर (म्हाडा) येथे 2004 घरांच्या निर्मितीस मान्यता मिळालेली आहे. संबंधित कुटुंबांचे स्थलांतर प्रक्रियेत असून लवकरच त्यांचे पुनर्वसन होणार आहे.
 
 
या अनुषंगाने पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बेदखल कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तातडीने घर बेदखल  कारवाई झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
 
 
यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
 
 
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, नगरसेविका सुनिता ताई जयस्वाल, अमित निरंजने, बादल जयस्वाल  वाणी साधनवार, स्वीय सहाय्यक संजय रेनचवर , आशिष गिरडकर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
केंद्र शासनाच्या पाठपुराव्यामुळे 2004 घरांच्या निर्मितीस मान्यता मिळालेली असून लवकरच सर्व पात्र कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशासनाने मानवीय दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.