The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

नियोजनात कोणतीही त्रुटी न ठेवता शेतकरी सुभलाम-सुफलाम व्हावा या दृष्टीने अधिकार्याने काम करावे - आमदार किशोर जोरगेवार.

News Image

कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत. खरीप हंगाम हा आपल्या जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या हंगामावर त्यांच्या वर्षभराच्या उत्पन्नाचा मोठा भाग अवलंबून असतो. त्यामुळे नियोजन करताना कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी. शेतकरी सुभलाम-सुफलाम झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक अधिकार्याने काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. जिल्हा कृषी कार्यालयात खरिप हंगाम पुर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शेतकरी आणि अधिका-यांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने, मंडळ कृषी अधिकारी साईनाथ ढेडारे, गट विकास अधिकारी संगीता भांगरे, नायब तहसिलदार ओमकार ठाकरे, साखरवाही फार्मर प्रोडकक्शन कंपणीचे संचालक नामदेव डाहुले, प्रगतशिल शेतकरी तेजराज बरडे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, ते पुढे म्हणाले की, शेतकर्यांना वेळेवर बियाणे, खते आणि कीडनाशके उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये. पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून पर्यायी पिकांचे नियोजन तसेच जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. एक गाव एक वाण” या संकल्पनेप्रमाणे “एक गाव एक अवजार बँक” ही योजना राबविण्यावर त्यांनी विशेष भर दिला. “शेतकर्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक अवजारे सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रत्येक गावात अवजार बँक उभारणे आवश्यक आहे. या योजनेसाठी शासनातर्फे निधी देण्याची आमची पूर्ण तयारी असल्याचे ते म्हणाले. ते पूढे म्हणाले की, बोंड अळीमुळे दरवर्षी उत्पादनात मोठी घट होत आहे. ही गंभीर समस्या असून यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तज्ञांकडून सखोल अभ्यास करून योग्य आणि प्रतिरोधक बियाण्यांची शिफारस करावी, तसेच शेतकर्यांना त्याबाबत योग्य मार्गदर्शन द्यावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देताना त्यांनी सांगितले की, “ड्रोन तंत्रज्ञान, मृदापरीक्षण, हवामान अंदाज यांचा योग्य वापर करून उत्पादन वाढवता येते. कृषी विभागाने या सुविधा शेतकर्यांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम बनवावे.” तसेच, “प्रशासन आणि कृषी विभागातील अधिकारी यांनी समन्वयाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गावात जाऊन शेतकर्यांशी थेट संवाद साधा, त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि तातडीने उपाययोजना करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, शेतकरी समृद्ध झाला तरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकार्याने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे असेही ते म्हणाले. बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.