Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर : नवीन चंद्रपूर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल १४४ कोटी ३८ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आहे. या निधीतून म्हाडा अंतर्गत दाताळा, कोसारा, पडोली या भागांमध्ये मुख्य डीपी रस्ते, स्ट्रीट लाईट, बंदिस्त नाली आदी मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. नवीन चंद्रपूर परिसरात वाढत्या वसाहतींमुळे पायाभूत सुविधांची तीव्र गरज निर्माण झाली होती. रस्ते, नाल्या व प्रकाश व्यवस्था यांसारख्या मूलभूत सोयींच्या अभावामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. या मागणीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रश्नावर विशेष लक्ष केंद्रित करून शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला. या संदर्भात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. पुढे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतरही आमदार जोरगेवार यांनी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवत निधी मंजुरीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी २२ मे २०२५ रोजी नागपूर येथील म्हाडा कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत म्हाडा नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुमार मेघमाडे, कार्यकारी अभियंता दीप्ती काळे, अभियंता मोनिका थोटे, एडीटीपी भाग्यश्री टाक विद्युत विभागाचे उपअभियंता चंद्रशेखर वानखेडे व करण नायर उपस्थित होते. या बैठकीत विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर मुंबई मंत्रालयात ७ मे २०२५ ला म्हाडा गृहनिर्माणचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासोबतही आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना विकास आराखडा तयार करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.या सर्व प्रयत्नांनंतर आता या विकासकामांसाठी निधी मंजूर झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे नवीन चंद्रपूर परिसरातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळणार असून, परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, नवीन चंद्रपूर परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रस्ते, नाली आणि प्रकाश व्यवस्था यांसारख्या सुविधा उभारल्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावेल. या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे समाधान असून, येत्या काळातही चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरूच राहतील.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: