The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आदिवासी उमेदवारांकरिता विनामुल्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

News Image

इच्छुकांनी 26 नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा.

चंद्रपूर,दि.28 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसुचित जमाती (एस. टी.) प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग 01 डिसेंबर 2026 पासून सुरू होणार आहेत. हे वर्ग आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पहिला माळा, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

सदर मार्गदर्शन वर्ग 01 डिसेंबर 2026 ते 15 मार्च 2027 या कालावधीत होणार असून वर्ग-3 व 4 पदांसाठी होणा-या स्पर्धात्मक परीक्षेची सविस्तर तयारी करून घेण्यात येईल. करीता इच्छुक उमेदवारांनी 26 नोव्हेंबर 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रांच्या (आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्रे, व बँक पासबुक) छायाप्रतींसह नोंदणी फॉर्म या कार्यालयात सादर करावा. नोंद केलेल्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत 27 नोव्हेंबर2026 रोजी घेण्यात येईल तर निवड यादी 30 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिध्द केली जाईल.

मार्गदर्शन वर्गामध्ये गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी तसेच मराठी हे विषय अनुभवी मार्गदर्शकांमार्फत शिकविले जातील. निवड झालेल्या उमेदवारांना चार (04) पुस्तकांचे संच तसेच प्रतिमाह रु. 1000/- विद्यावेतन देण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन शंकर गभाले यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी मनोज सिडाम (मो. 9764580986) यांच्याशी अथवा कार्यालयाशी संपर्क साधावा.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔बंधाऱ्याचे बिल मंजूर करण्यासाठी ₹४० हजारांची लाच स्वीकारताना कोरपण्यातील कृषी सहाय्यक ACB च्या जाळ्यात.🔔पोलीस स्टेशन राजुरा येथील दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला फरार आरोपीस अन्य चोरीच्या गुन्ह्यातही मुद्देमालासह पकडून आरोपी विरुध्द स्थागुशा चंद्रपूर कडून कारवाई.🔔निवडणूक संपताच आमदार किशोर जोरगेवार कामाला, नजूल धारकांच्या पट्टे वाटपासाठी महसूल मंत्री यांच्याकडे पाठपुरावा.🔔नदीतून वाहून जाणारे पाणी शेतीसाठी वापरण्याची परवानगी देण्याची आमदार मुनगंटीवार यांची मागणी; बोअरवेलधारक शेतकऱ्यांना ५०० मीटरच्या अंतराच्या निकषासंदर्भात नियमांनुसार सवलती देण्याचे आवाहन.🔔महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्जांचा 29 ऑक्टोबर रोजी आढावा.🔔आदिवासी उमेदवारांकरिता विनामुल्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.🔔2 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.🔔परिवहन वाहनधारकांनी 1 नोव्हेंबरपूर्वी योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे.