The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

मुल मालधक्का प्रकल्पाला ब्रेक; आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.

News Image

केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची स्पष्ट भूमिका; स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा. प्रदूषण, वाहतूक आणि नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा ठरला निर्णायक. चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मुल रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावित मालधक्का (गुड्स यार्ड) प्रकल्प रद्द करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेत या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध, संभाव्य प्रदूषण आणि पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता मुल येथे मालधक्का उभारला जाणार नसल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. दिल्ली येथे पार पडलेल्या या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, अजय दुबे सदस्य ZRUCC मध्य रेल्वे मुंबई, रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुल शहरातील प्रस्तावित गुड्स यार्ड प्रकल्पामुळे आयर्न ओअर आणि इतर खनिज पदार्थांच्या लोडिंग-अनलोडिंगमुळे मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होण्याची शक्यता होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, पिकांचे नुकसान होईल तसेच जलस्रोत दूषित होण्याचा धोका निर्माण होईल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर ठामपणे मांडली. मुल शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि ग्रामीण शांततेवर होणारा परिणाम लक्षात घेता हा प्रकल्प जनहिताच्या विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ. मुनगंटीवार यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी मुल शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि ग्रामीण शांततेवर होणारा परिणाम लक्षात घेता हा प्रकल्प जनहिताच्या विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ. मुनगंटीवार यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी संबंधित प्रकल्प त्या ठिकाणी होणार नसल्याचे स्पष्ट करत स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.