The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

महिलांच्या गौरवार्थ केवळ विशेषणे वापरू नका, महिला आयोगाला भरीव निधी द्या : आमदार सुधीर मुनगंटीवार.

News Image
कायद्यात बदल करण्यासाठी महिला आमदारांची समिती गठीत करावी. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत बैठक घेवून तोडगा काढण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन. आपण राज्‍यात उत्‍साहाने महिला दिन साजरा केला, महिलांच्‍या गौरवार्थ मोठमोठी भाषणे दिली, मात्र राज्‍य महिला आयोगातील बाहृय यंत्रणेच्‍या माध्‍यमातुन भरण्‍यात आलेली पदे स्‍थायी करण्‍याची मागणी प्रलंबित आहे, त्‍यांना स्‍थायी करण्‍याबाबत निर्णय घेतला जात नाही. महिला आयोगासाठी १८ कोटी रू. निधी मंजूर केल्‍याचे सांगीतले जाते. मात्र यातील किती निधी खर्च झाला, किती निधी वितरीत केला याची माहिती दिली जात नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे, असे सांगत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महिला अबला नाही सबला आहे, नारी से नारायणी तक अशी विशेषणे वापरून भलावण करण्यापेक्षा महिला आयोगाच्‍या सबलीकरणासाठी भरीव निधी द्यावी अशी मागणी विधानसभेत केली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या सुचनांच्‍या अनुषंगाने एक बैठक घेवून यासंदर्भात योग्‍य निर्णय घेण्‍यात येईल, असे आश्‍वासन महिला व बालविकास राज्‍यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत दिले. दिनांक ९ मार्च २०२६ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य महिला आयोगाबाबत उपस्थित केलेल्‍या तारांकित प्रश्‍नावर विधानसभेत चर्चा झाली. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, २५ जानेवारी १९९३ मध्‍ये यासंदर्भात आपण कायदा केला. मात्र या कायद्यात कालसुसंगत बदल झालेले नाही. महिलांबाबत डिजीटल सायबर गुन्‍हयांच्‍या संख्‍येत वाढ होत आहेत. या कायद्यात बदल करण्‍याच्‍या दृष्‍टीने महिला आमदारांची समिती गठीत करावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. हुंडाबळी, लैंगीक अत्‍याचार, कामाच्‍या ठिकाणी छळ, सायबर क्राईम अशा विविध गुन्‍हयांबाबत फाईल्‍स मंत्रालयात पाठविल्‍या जातात, विहीत कालावधीत न्‍याय मिळत नाही. त्‍यामुळे यासंदर्भात निर्णय घेण्‍याबाबत महिला आयोगाला स्‍वायत्‍तता द्यावी, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.हा आयोग आहे, आयोगाला विशेषाधिकार असले पाहिजे अशी आग्रही भूमीका त्यांनी मांडली. महिला आयोगातील पदभरती संदर्भात आकृतीबंध मंत्रीमंडळासमोर मान्‍यतेसाठी ठेवण्‍यात आलेला आहे. निधीचे वितरण व खर्च याबाबतची माहिती आपण सभागृहाच्‍या पटलावर ठेवू, आयोगासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्‍वासन महिला व बालविकास राज्‍यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.