Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या हत्तीरोग निर्मूलनाच्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि आरोग्य विभागाकडून दिली जाणारी औषधे वेळेवर सेवन करावीत, असे आवाहन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय हत्तीरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात १० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे.ही मोहीम हत्तीरोग निर्मूलनासाठी अत्यंत महत्त्वाची असून, दोन वर्षांखालील बालके, गर्भवती माता व गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्ती वगळता सर्व पात्र नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधे देण्यात येणार आहेत. ही औषधे सुरक्षित व प्रभावी असून, रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी नागरिकांनी न चुकता सेवन करणे आवश्यक आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक यंत्रणांनी या मोहिमेत सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तसेच आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच गोळ्यांचे सेवन करावे आणि त्या उपाशीपोटी घेऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक घरापर्यंत पोहोचणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून औषधांचे सेवन करावे, असे त्यांनी सांगितले. हत्तीरोगमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्रितपणे या मोहिमेला यशस्वी करावे, असेही आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: