The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रभाग १७ मध्ये महायुतीच्या उमेदवार प्रतिभा ठाकूर यांच्या प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

News Image
प्रभाग क्रमांक १७ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये भाजप–शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा ठाकूर यांच्या प्रचार कार्यालयाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उद्घाटन प्रसंगी शिवसेना (शिंदे गट) चे पूर्व विदर्भ संघटक व ज्येष्ठ नेते किरण पांडव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह महायुतीचे पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते. या प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे, तसेच विकासाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, हा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. महायुतीच्या माध्यमातून नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प उपस्थित नागरिकांनी केला. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर हा सामाजिक सलोखा, संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेला परिसर आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. प्रतिभा ठाकूर या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या, काम करण्याची जिद्द असलेल्या उमेदवार असून त्या नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाशी आपुलकीने जोडल्या गेलेल्या आहेत. आज उद्घाटन होत असलेले हे प्रचार कार्यालय केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून, येथील नागरिकांच्या अडचणी ऐकण्याचे व त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे केंद्र बनेल. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांवर महायुती प्राधान्याने काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य व केंद्र सरकारच्या विकास योजनांचा थेट लाभ या प्रभागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करू. नागरिकांचा विश्वास, कार्यकर्त्यांची ताकद आणि महायुतीची एकजूट याच्या जोरावर प्रभाग क्रमांक १७ मध्ये निश्चितच विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असे ते यावेळी म्हणाले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.